आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झरी बु येथे 10 लक्ष रुपयांच्या विकासकामाचे भुमीपजन
चाकुर (गोविंद काळे) : तालुक्यातील झरी बु येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भुमिपुजन चाकुर- अहमदपुर विधानसभा मतदारसंघ चे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी नामदेव सुरवसे होते. व्यासपीठावर माधवराव जाधव, तुकाराम पाटील, बाळासाहेब पाटील झरीकर, पप्पू पाटील, बालाजी कदम, दयानंद सुरवसे, युवराज सूर्यवंशी, बालाजी मेनचक्रे, नितीन पाटील रामभाऊ सारोळे,पारप्पा शिंदे, दयानंद पाटील, बबन गव्हाणे, माधवराव वाकळे, राहूल सुरवसे, अनीलराव वाडकर, नारायणराव राजुरे, रामदास घुमे, मोहन जगताप, धनंजय चव्हाण, विवेक शिंदे, चंद्रकांत आडसकर, विठ्ठल उदगीरे, सचिन तोरे, पांडुरंग धडे, लहु सुरवसे सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद सुरवसे यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश स्वामी यांनी केले.