महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त गणवेशाचे वाटप

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त गणवेशाचे वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : दि. 12 मार्च रोजी जि प प्रा शाळा धानोरा खुर्द येथे covid-19 चे नियम पाळून हाताला सॅनिटायझर चा वापर सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम घेण्यात आला .संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांचा सत्कार करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबरराव गायकवाड (शा. व्य.स) अध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री गुंडेवाड साहेब (ग्रामसेवक), सत्कार मूर्ती श्री प्रभाकर नारायण वाकडे (सरपंच), श्री बापूराव संभाजी होनराव (उपसरपंच), श्री संतोष नारायण गायकवाड (ग्रा.स) सौ रंजना प्रभुआप्पा नाकसाखरे (ग्रा.स), कल्पना कमलाकर कामजवळगे (ग्रा.स),सौ मनीषा सुरेश गायकवाड (ग्रा.स) सौ कविता अमोल गायकवाड (ग्रा.स), या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री देवकते डी.के यांनी केले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पॅन्ट शर्ट व मुलींना पंजाबी ड्रेस वाटप केले यावेळी प्रभाकर वाकडे, संतोष गायकवाड, रंजना नाकसाखरे, बापू होनराव यांनी समयोचित भाषण केले त्यांनी आपल्या भाषणात शाळेसाठी भौतिक सुविधा भौतिक सुविधा निधी कमी पडू देणार नाही असे अभिवचन दिले सूत्रसंचालन श्री मिरजगवे पी इ यांनी केले श्री नायनेवाड व्ही बी,कमलाकर कामजवळगे, उषा नवनाथ कारगावे, वैशाली गणपत श्रीमंगले, रोहिदास श्रीमंगले यांनी परिश्रम घेतले.

About The Author