स्त्रीला समानतेची संधी देऊन सन्मानाची वागणूक देण्याची गरज – माधवी चौकटे
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’ निमित्त राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी माधवी चौकटे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्री घरात चांगले आर्थिक नियोजन लावते . स्त्री मुळेच घराला घरपण येतं परंतु त्याच स्त्रीला समानतेची संधी देऊन सन्मानाची वागणूक देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाची माजी आदर्श विद्यार्थीनी सौ.माधवी चौकटे यांनी केले.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाच्या वतीने आभासी तथा दूरदृश्य प्रणाली (ऑनलाइन ) च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘महिला सशक्तीकरण वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी सौ. माधवी चौकटे ह्या बोलत होत्या . या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून वरंगल येथील सातवाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद इक्बाल अली हे उपस्थित होते तसेच विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. अनुपमा अलवाईकर, डॉ. मीनाक्षी नांदापूरकर, ( हैदराबाद) सुप्रसिद्ध लेखिका डॉ. ललिता गादगे, डॉ. माधवी कवी (पुणे) आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शोध पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपाप्रसंगी सौ .माधवी चौकटे म्हणाल्या की, घरात मुलांचा अभ्यास घेणारी सरस्वती, अन्न बनवणारी अन्नपूर्णा देवी , आत्याचार झाला तर कालिकेचे रूप घेणारी कालिका तर कुटुंबावर संकट आले तर दुर्गेचे रूप धारण करणारी ही स्त्रीच आहे. स्त्री घरात चांगले आर्थिक नियोजन लावते. स्त्री मुळेच घराला घरपण येतं परंतु त्याच स्त्रीला समानतेची संधी देऊन सन्मानाची वागणूक देण्याची गरज आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाने यांनी केले तर सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले. तर आभार इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे यांनी मानले. तंत्र सहाय्य डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचीन गर्जे व ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांनी केले. या राष्ट्रीय चर्चासत्रात देशातील विविध भागातून बहुसंख्य अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.