म. फुले महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

म. फुले महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशीक च्या केंद्राचे संयोजक डॉ.अनिल मुंढे हे उपस्थित होते. यावेळी डॉ. अनिल मुंढे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. तसेच या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मारोती कसाब यांनी केले तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी कोवीड-19 तिच्या नियमांचे पालन करुन उपस्थित होते.

About The Author