अहमदपूर येथे पीकविमा वाटपासाठी मनसेचे धरणे आंदोलन
जिल्हाभर आंदोलन करण्याचा डॉ भिकाणे यांचा इशारा
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोना महामारी, तिबार पेरणी, बोगस बियाणे व अतिवृष्टी अश्या विविध समस्या शेतकऱ्यांवरती यावर्षीच्या एकाच खरीप हंगामात कोसळल्या मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पुरते मोडले असून नेमके याच वर्षी खरीप पीकविमा अद्यापही शेतकऱ्यांना वाटपच काय तर मंडळनिहाय जाहीरही झाला नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर तहसील समोर त्वरित पीकविमा वाटप करा या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांना खरीप पीकविमा या अडचणीच्या काळात लवकर मिळणे अपेक्षित होते परंतु तब्बल दोन महिने उशीर झाला आहे त्यामुळे पिकविम्याची रक्कम व्याजासाहित शेतकऱ्यांना देण्यात येणे गरजेचे आहे.चाळीस टक्के शेतकऱ्यांचा विमा रद्द झाल्याचे पीकविमा कंपनी चे अधिकारी खाजगीत सांगत आहेत या मागचे सत्य व कारण प्रशासनाने शेतकऱ्यांना सांगणे गरजेचे आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.बोगस बियाण्यामुळे पीक उगवू शकले नाही,जे आले ते पावसाने वाहून गेले,याचे पंचनामे करून सरकारने तोकडे अनुदानही दिले परंतु शेतकऱ्यांनी अडचणीत मदत करण्यासाठी पैसे भरून काढलेला विमा जर विमाकंपनी नुकसानभरपाई करून परत करणार नसेल तर हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.मग अनुदान दिले त्यावेळेस चे पंचनामे खोटे होते का?पीकविमा कंपनी व प्रशासन यांच्यामध्ये विरोधाभास दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा व त्याच्या पंचनाम्याची प्रतही त्याला देण्यात यावी जेणेकरुन दोन पंचनाम्यातील फरक ही लक्षात येईल अशीही मागणी धरणे आंदोलनात करण्यात आली
चौकट[शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम त्वरित नाही भेटली तर मनसे जिल्हाभर आंदोलन करून विमा कंपनी ला व प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडेल असे जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यावेळी बोलताना म्हणाले तसेच आमदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय अधिवेशनात का उचलला नाही असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.यावेळी तालुकाध्यक्ष डॉ मिलिंद साबळे,शहराध्यक्ष अतिष गायकवाड, तालुकाउपाध्यक्ष उत्तम मुरकुटे,तालुका सचिव मयूर पलमटे,तालुका उपाध्यक्ष विलास सांगुळे, विभागाध्यक्ष गजानन पांगरे,गणेश शेटकर,आनंद पलमटे,शंकर गायकवाड, केशव कसले,मरीबा आचार्य,लक्षमन भदाडे,उत्तम कंदे,कार्तिक भिकाणे,उत्तम आचार्य,नितीन जगताप,जनार्दन फड,किशन कसले,मंचक सूर्यवंशी,अनिकेत कांबळे, नितीन जगताप, प्रशांत नामपल्ले,सुनील कंदे,अनंत पलमटे,शंकर गायकवाड,मंचक पवार,रोहन कांबळे,नवनाथ सांगुळे,दीनानाथ गायकवाड,कंठीराम पेड,शिवराज कासले,अप्पाराव आचार्य,दिगंबर जाधव,सूर्यकांत सूर्यवंशी, रमाकांत कोरनुरे आदी उपस्थित होते.तसेच शिवक्रांती युवासंघटन चे मराठवाडा अध्यक्ष भुजंग उगीले व अखिल भारतीय स्वभीमानी छावा संघटनेचे प्रदेश संघटक राजीव मोहगावकर यांनी धरणे आंदोलनाला भेट देत पाठिंबा दर्शवला.