शरीरसुखाची मागणी करणाऱ्या समाज कल्याण अधिकार्यावर गुन्हा दाखल

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या समाज कल्याण अधिकार्यावर गुन्हा दाखल

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा परिषदेतील जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी 23 वर्षीय तरुणीकडे अनुकंपा तत्वावर नोकरीची ऑर्डर देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली होती याप्रकरणी त्या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या समाज कल्याण अधिकार्यावर गुन्हा दाखल

सविस्तर माहिती अशी की, 23 वर्षीय फिर्यादी तरुणीचे वडील हे मतिमंद विद्यालय येथे विशेष शिक्षक म्हणून कार्यरत होते. नोकरीवर असतानाच त्या तरुणीच्या वडिलांचे निधन झाले वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून त्या तरुणीने लातूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे अर्ज केला अर्ज केल्यानंतर त्या तरुणीचे नाव प्रतीक्षा यादीत आले तसेच संबंधित मतिमंद विद्यालयात रिक्त पदही होते. जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी त्या तरुणीची ऑर्डर देण्यास टाळाटाळ केली. वारंवार प्रयत्न करून नियुक्तीची ऑर्डर मिळत नव्हती. समाज कल्याण अधिकारी खमितकर यांची भेट घेऊन त्या तरुणीने ऑर्डर देण्याची विनंती केली परंतु तरुणीकडे ऑर्डर घेण्यासाठी द्यावे लागणारे पैसे नसल्याने ऑर्डर मिळत नव्हती फिर्यादी तरुणीकडे पैसे नसल्याने खमितकर यांनी त्या तरुणीला केबिनमध्ये बोलून तू मला एक दिवस एक रात्र माझ्यासाठी दे म्हणून शरीरसुखाची मागणी केली व वाईट नजरेने पाहून तरुणीचे चरित्र हनन केले हा सर्व प्रकार जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या केबिनमध्ये घडला या प्रकरणी फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन 11 मार्च रोजी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास संबंधित अधिकार्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 354 (अ) (1) (2) भादंवि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम कलम 3 (1), (डब्ल्यू), (1) (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author