भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवा संसदचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवा संसदचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : नेहरू युवा केंद्र, लातूर व दयानंद कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१२ मार्च २०२१ रोजी दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संसदीय कार्यप्रणालीची ओळख निर्माण व्हावी तसेच राष्ट्र निर्मिती व राष्ट्रभक्ती आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत याकरिता पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती साक्षी समैय्या जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र या होत्या तसेच उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, श्री.संजय ममदापूरे, रा.से.यो.समन्वयक डॉ.संतोष पाटील हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात पडोस युवा संसद कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यात सभापती- कु.ऋतुजा म्हेत्रे, पंतप्रधान- चंद्रकांत फड महीला व बालविकास मंत्री अल्फिया तांबोळी, कृषीमंत्री राहूल चेबळे , कायदेमंत्री बळीराम कानवटे, इतर मंत्री आशिष कुटवाडे, शुभम हाके, हे होते तर विरोधी पक्ष नेता म्हणून रामराजे काळे, उपगटनेता मेघराज शेवाळे, इतर संसद सदस्य भरत पवार, साक्षी लोखंडे, तय्यब सय्यद, मयुरी काळे, अनिल गाढवे, वसंत पवार, तर चोपदार -नानासाहेब कुंभार, रणजीत विभुते, अविनाश किरमिडे, सचिव अर्थव आगरकर, ऋषिकेश पवार, सुकेश आकनगिरे, ऋषिकेश आदमाने आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.विलास कोमटवाड, प्रा.महेश जंगापल्ले, गोविंद कांबळे, निलेश लाडेकर यांनी परिश्रम घेतले.

About The Author