शिरुर अनंतपाळ पोलिसांची मोठी कारवाई; 13 लाखांचा गुटखा जप्त!
शिरुर अनंतपाळ (प्रतिनिधी) : राज्यात बंदी असलेला गुटखा घेऊन जात असताना शिरुर अनंतपाळ पोलिसांनी सापळा रचून तब्बल 13 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. ही घटना गुरुवारी दि. 11 रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास साकोळ-वलांडी रोडवर स्कोल येथे घडली. यासंदर्भात शिरुळ आनंतपाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की साकोळ येथील अब्दुल नूरसाब उंटवाले हा कर्नाटक राज्यातून विक्री करण्यासाठी शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखू व पानमसाला गुटखा आणत असल्याची गुप्त माहिती खबऱ्या मार्फत शिरूर अनंतपाळ पोलिसांना मिळाली होती. शिरूर अनंतपाळचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश म्हेत्रे पोलीस हेड कॉ. सतीश सारोळे, पोलीस कर्मचारी लतीफ सौदागर शिवाजी गिरबोने यांच्या पथकासोबत जाऊन तात्काळ सापळा रचला त्यानंतर रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सदर वाहन साकोळ-वलांडी रोडवर बोलेरो पिकअप टेम्पो (एम एच 24 अव 4819) तिथे आला. पोलिसांनी सदर टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात राज्यात बंदी असलेल्या गुटखा आढळून आला.
यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व विक्रीस बंदी असलेला सुगंधी तंबाखू, पानमसाला, विमल, बाबा नवरतन, गीतांजली 5000 पानमसाला रजनीगंधा पान मसाला, अशा अंदाजे 7 लाख 2 हजार 750 रुपयांचा माल आढळून आला. पुन्हा लॉक डाऊन होईल म्हणून गुटका स्टॉक करून विक्री करण्यासाठी साकोळ येथील अब्दुल नुरसाब उंटवाले याने पिकअप भरून कर्नाटकातून गुटका आणला होता. त्यांचे प्रयत्न शिरुळ अनंतपाळ पोलिसांनी हाणून पाडले एकूण ७ लाख 2 हजार 750 रुपयांचा गुटखा व ६ लाख रुपये किंमतीची बोलेरो पिकअप असा जवळपास 13 लाख 275 रुपयांचा माल जप्त करीत आरोपी अटक केले आहे.
यासंदर्भात शिरूर अनंतपाळ पोलिसात लातूरचे अन्नसुरक्षा अधिकारी दयानंद विठ्ठलराव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुरन 63/21 कलम 328, 272, 273, भादवीसह 59 अन्नसुरक्षा सुरक्षा व मानदे कायदानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकामी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश म्हेत्रे पोलीस हेड कॉ. सतीश सारोळे, पोकॉ लतीफ सौदागर, शिवाजी गिरबोने आदींनी कामगिरी केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम करीत आहेत.