दयानंद कला महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जंयती साजरी
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात शुक्रवार दि.12 मार्च रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांनी ब्रिटीश सत्तेविरोधात लढे उभे जुलमी राजवटी विरोधातील चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. शालेय जीवनातच ते क्राँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय कमिटीमध्ये कार्य करत होते. त्यामुळे महाराष्ट्रात ते एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाऊ लागले. जेव्हा स्वातंत्र्य मिळाले व भाषावाद प्रांतरचना म्हणून 1956 ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. पुढे चीनने आक्रमण केल्यानंतर नेहरूंच्या समोर संरक्षणमंत्रालयात असे नेतृत्व असावे म्हणून यशवंतराव चव्हाण यांची संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा सह्याद्री हा हिमालयाच्या संरक्षणासाठी जात आहे. मला आर्शीवाद द्या, अशी भावनिक अव्हान त्यांनी केले होते. पुढे परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री, विरोध पक्षनेता इत्यादी भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. भारताचे ते पंतप्रधानही होऊ शकले असते. पण पूढे दुर्दुवाने त्यांचा मृत्यु झाला. असे प्रतिपादन प्रा.महेश जंगापल्ले यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, डॉ सुनिता सांगोले, डॉ मच्छिंद्र खंडागळे, डॉ.नितीन डोके, प्रा.संजय कुलकर्णी, डॉ. प्रंशात दिक्षित, डॉ गोपाल बाहेती, कार्यालयीन अध्यक्षक श्री. नवनाथ भालेराव, रामकिसन शिंदे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.