हिवरावासियानो सावधान; कोरोना विषाणू वाढतोय
अप्पती व्यवस्थापन समिती व आरोग्य प्रशासनाकडून जनजागृती
महागाव (राम जाधव) : महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. हिवरा, अनंतवाडी,अनंदनगर, कासारबेहळ तसेच तालुक्यातील अनेक भागात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात सध्या कोरोनाची गंभीर परस्थिती होताना दिसत असून नागरिक शासन व प्रशासनाच्या नियमाचे पालन करताना दिसत नाही आहे.तालुक्यातील हिवरा संगम येथे तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण आढळल्याची माहिती आहे.तर मागील चार दिवसापासून हिवरा येथे सतत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने हिवरा गावात आपत्ती व्यवस्थापन समितीने मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार हिवरा येथील प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या वॉर्ड क्रमांक 2च्या सीमा बंद केल्या असून गावात जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. तर हिवरा गावातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ४० वर पोहचली असून शुक्रवारी १४६ नागरिकांची कोरोना चाचणी केली असून यामध्ये गावातील व्यापारी व दुकानातील कर्मचारी यांची सुद्धा चाचणी केली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली त्यामध्ये निगेटिव्ह असलेल्या व्यापाऱ्यांना पत्र देऊन दुकाने चालू करण्याचे आदेश देण्यात येईल अशी माहिती आरोग्य प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन समितीने दिली आहे. वाढत्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची परस्थिती लक्षात घेता अप्पती व्यवस्थापन समितीने जनजागृती सुरू केली असून नागरिकांनी कर्फ्यु मध्ये बाहेर पडू नये,मास्क लावावा, सॅनिटायझरचा सतत वापर करावा. सामाजिक अंतर पालवे याबद्दल वेळवेळी नागरिकांना सूचना करत आहे.या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासन व अप्पती व्यवस्थापन समिती सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तर गावामध्ये कोरोना चाचणी घेण्यासाठी कोव्हिडं सेंटरचे आरोग्य पथकाने सकाळी ११ वाजता पासून ते ५वाजेपर्यंत शिबिर घेतले असून शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी,अप्पती व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकारी,पोलीस प्रशासन व होमगार्ड तसेच आरोग्य प्रशासनाचे वैभव नखाते, नागपुरे साहेब,प्रणव गावंडे, वाल्मिक टाकरस,जांभुळकर मॅडम तसेच आशासेविका अनिता वानखेडे, दर्शना कांबळे,शोभाताई बोदारे, लॅब टेक्निशियन अमोल ढाकरगे यांनी परिश्रम घेतले आहे.घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीच्या शिबिरात २४ पॉझिटिव्ह रुग्णांना कोव्हिडं सेंटर महागाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ जब्बार पठाण यांनी दिली आहे.
चारही अधिकाऱ्यांनी दिली शिबिरादरम्यान भेट-
हिवरा येथील कोरोनाच्या गंभीर परस्थिती लक्षात घेता शिबिरादरम्यान तहसीलदार ईसळकर साहेब, महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण साहेब, BDO मयूर अंदेलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ जब्बार पठाण साहेब या चारही अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन आढावा घेतला आहे.
महागाव पोलिसांचे जनता कर्फ्यु दरम्यान पथसंचालन-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवरा येथे जनता कर्फ्यु लागला असून जनता कर्फ्युचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण साहेब व त्यांचे पोलीस,होमगार्ड पथकातर्फे शुक्रवारी पथसंचालन केले.