शहरात दहशत निर्माण करणा-या ४ आरोपीना ३६ तासात शिवाजी नगर पोलीसांनी केली अटक
लातूर (प्रतिनिधी) : दि. १०/०३/२०२१ रोजी २२.०० वाजणेच्या सुमारास जुना औसा रोड परिसरातील लगसकर बिल्डींग समोर आरोपी नामे १) सागर सुनिल गायकवाड (आष्टेकर) वय २४ वर्षे रा. जुना औसा रोड लातुर २) पियुष राजेंद्र जाधव वय २१ वर्षे ३) अक्षय माधव कांबळे वय २३ वर्षे ४) अदित्य विजय म्हेत्रे वय १९ वर्षे ५) साहील रशिद पठाण वय वय २० वर्षे अशी गैरकायद्याची मंडळी जमवुन असे मोठ-मोठ्याने आरडा ओरड करित सदर चौकाचे बाजुला उभी असलेली एक अब्युलन्स व दोन कार यांच्यावर दगड मारुन काचा फोडल्या. त्यामुळे सदर परिसरात दहशत निर्माण झाली. फिर्यादी सुमित गुणवंतराव झींझुरे व इतर यांनी सदर आरोपीतांना तोडफोड का करता असे विचारले असता त्यांना तुम्ही कोण विचारणार असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर वरील आरोपी पांढ-या रंगाची क्रमांक MH-24 AF-1375 मध्ये बसुन पुढील गल्लीत निघुन गेले त्यानंतर तक्रारदार सुमित झीझुंरे व त्याचा मित्र रत्नेश्वर सुधाकर डुमणे रा.लातुर असे दोघे त्यांचे अॅक्टीव्हा स्कुटीवरून सुशीलादेवी नगर कडे जात असताना वर नमुद कार मध्ये वरील आरोपी हे विरुद्ध दिशेने येवुन तक्रारदार यांचे अॅक्टीव्हा स्कुटीला जिवे ठार मारण्याचे उद्देशने जोरदार धडक देवुन गंभीर जखमी केले. त्यावेळी इतर लोक जमा झाल्याने सदर आरोपी कार घेवुन पळुन गेले वगैरे मजकुर तक्रारीवरुन पो.स्टे शिवाजी नगर लातुर येथे गुरन १३१/२०२१ कलम ३०७.१४३,१४७,१४९.४२७,५०४,५०६, मादवी व १३५ मपोका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील गुन्ह्याचे तपास अनुषंगाने श्री जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी लातुर (शहर), श्री सुनिलकुमार पुजारी पोलीस निरीक्षक पोस्टे शिवाजी नगर लातुर यांनी घटनास्थळास भेट देवुन सदर गुन्ह्यामधील आरोपींचा शोध घेणे कामी विशेष पोलीस पथक तपास अधिकारी श्री पवार सपोनि यांचे अधिपत्याखाली नेमुण आरोपीतांस तात्काळ अटक करणेबाबत त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. त्यावरुन आरोपी नामे सागर सुनिल गायकवाड (आष्टेकर) रा.जुना औसा रोड लातुर यास दिनांक ११/०३/२०२१ रोजी प्रथमतः ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. तद्नंतर दिनांक १२/०३/२०२१ रोजी इतर आरापीतांना २) पियुष राजेंद्र जाधव वय २१ वर्षे ३) अक्षय माधव कांबळे वय २३ वर्षे ४) अदित्य विजय म्हेत्रे वय १९ वर्षे यांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली पांढ-या रंगाची कार क्रमांक MH-24 AF-1375 हि जप्त करण्यात आलेली आहे. रत्नेश्वर सुधाकर डुमणे रा.लातुर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारकामी सह्याद्री हॉस्पीटल लातुर येथे अॅडमीट आहेत. सदर घटनेसंदर्भाने सदर परिसरात सध्या शांतता आहे, पोलीस पेट्रोलींग ठेवण्यात आलेली आहे.
मा. श्री निखील पिंगळे पोलीस अधिक्षक साहेब लातुर तसेच श्री हिमंतराव जाधव अपर पोलीस अधिक्षक साहेब लातुर व श्री जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी लातुर (शहर) यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी सपोनि पवार, सफी शमशोद्दीन काझी,गोविंद चामे, नागनाथ नराळे, राजकुमार हणमंते, काकासाहेब बोचरे,असे करित आहेत.