माजी आ.कव्हेकरांकडून भूतडा कुटुंबियाचे सांत्वन

माजी आ.कव्हेकरांकडून भूतडा कुटुंबियाचे सांत्वन

लातूर (प्रतिनिधी) : येथील विशाल नगर भागातील अ‍ॅड. विष्णुदास रंगलालजी भूतडा (वय 85 वर्ष) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, नातू, पंतू असा परिवार आहे.या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देवून भूतडा कुटुंबियाचे सांत्वन केले.यावेळी त्यांच्या पत्नी राधाबाई विष्णुदास भुतडा,जावई डॉ. जयप्रकाश शिवप्रसाद दरगड, डॉ.जगदीश लोया, नातजावई लक्ष्मीकांत मणीयार यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासमवेत माजी जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे,आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!