कोव्हिडच्या पार्श्वभूमिवर ऑनलाईन पध्दतीने जागतिक महिला दिन साजरा
विविध लॉयन्स क्लबच्या माध्यमातून साधला संवाद
लातूर (प्रतिनिधी) : कोव्हिड-19 मुळे दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली तरीही जनता मात्र गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे लायन्स क्लब,लातूर, सावित्री लायन्स क्लब,लातूर परिवर्तन लायन्स क्लब,गांजूर व नारी प्रबोधन मंच लातूर यांच्यावतीने डिस्ट्रीक्ट लायनेस क्लबच्या प्रांताध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्याहस्ते जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचेे पुजन करून ऑनलाईन पध्दतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी सावित्री लायन्स क्लबच्या सचिव सुनिता मुचाटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कृषी अभ्यासक नामदेव जाधव यांनी “सेंद्रिय शेती व औषधी वनस्पती” यावर सविस्तर मार्गदर्शन केले. बालाजी बिराजदार यांनी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या भक्कम सहकार्याने तरूण तरूणींना उद्योजक बनण्याची सुवर्णसधीं आहे. ती संधी सर्व महिलांनी घेतली पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून छोटे-मोठे उद्योग उभारून स्वावलंबी बनावे, असे आवाहन “मी उद्योजक होणारच“ या व्याख्यानातून व्यक्त केले. व क्रांती बिराजदार यांनी “नारी ही अबला नसून ती सबलाच आहे. “या विषयावर मार्गदर्शन केले. सुमती जगताप, लायनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ. कुसुम मोरे, व सावित्री लायनेस क्लबच्या अध्यक्षा शितल वाडीकर यांनी ऑनलाईन महिला दिनानिमित्त सहभागी महिलांना शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्षीय समारोप डिस्ट्रीक्ट लायनेस क्लबच्या अध्यक्षा तथा प्रांताध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्या भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबच्या उपाध्यक्षा विद्या देशमुख व अरूणा कांदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लायन्स क्लब,लातूरच्या उपाध्यक्षा अलका अंकुशे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.दैवशाला नागदे यांनी मानले.