शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत किराणामालाचे मोठे नुकसान गावकऱ्यांनी केली दुकानदारास मदत

शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत किराणामालाचे मोठे नुकसान गावकऱ्यांनी केली दुकानदारास मदत

जळकोट (एल.पी.उगीले) : जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील किराणा मालाच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठे नुकसन झाले, यावेळी गावात सरपंच सुनील नामवाड हे निवडून आल्यानंतर मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली होती. यातील लोकानी आग विजवण्यवसाठी आजूबाजूच्या घरातील पाणी आणून दुकानाला लागलेल्या आगीला विजवण्याचा प्रयत्न केला, व विजवण्यात त्यांना यश आले. या घटनेत उत्तम भीमराव केंद्रे यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील किराणा मालाचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .या घटनेची गावात चर्चा होत होती. नुकसानीमुळे हे कुटुंब रस्त्यावर येणार होते. हे नुकसानग्रस्त कुटुंब रस्त्यावर येऊ नये, म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मदत करण्याचे ठरवले. आणि काही व्यक्तींनी मदतीचा हातही पुढे करून सढळ हाताने मदत केल्याने या कुटुंबास आधार झाला.

उत्तम केंद्रे यांच्या किराणा मालाच्या दुकानात पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे. मदत केलेल्या गावातील सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मानले आहेत. झालेले नुकसान खूप मोठे असले तरी, दिलेली मदत त्याहीपेक्षा मोठी आहे. असे बोलताना केंद्रे यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी मदत करण्याचा पुढाकार राजीव काळे यांच्या संकल्पनेतून आला असून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गुट्टे, नवनियुक्त सरपंच सुनील नामवाड,बाबुराव जाधव ,अशोक जाधव, रामदास केंद्रे, बालाजी आयनीले,दिलीप गुट्टे,सतीश बडगिरे, व्यंकट जाधव , बालाजी गुट्टे, उद्योजक सचिन केंद्रे ,शादुल मुल्ला आदी गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!