लालबहादुरच्या समर्थ महिंद्रकरची आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ इंटर-स्टेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

लालबहादुरच्या समर्थ महिंद्रकरची आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ इंटर-स्टेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

उदगीर ( एल.पी.उगीले) : लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी वर्गात शिकणाऱ्या समर्थ सुनील महिंद्रकर या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ इंटर-स्टेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.पोखरा (नेपाळ) येथे टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप (मुले आणि मुली) 2022-23 साठी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होत आहेत. ही स्पर्धा दि. २९ डिसेंबर ते ०२ जानेवारी २०२३ या कालावधीत नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

या स्पर्धेत निवड होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नेतृत्व करणाऱ्या समर्थचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,अनिता यलमटे ,प्रिती शेंडे ,वर्गशिक्षक रामेश्वर मलशेट्टे उपस्थित होते.प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक संतोष कोले ,शिवकुमार कोळ्ळे व वडील सुनिल महिंद्रकर यांचे मार्गदर्शन समर्थला लाभले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झालेल्या निवडीबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर ,उपाध्यक्ष जितेशजी चापशी ,कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य ,संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार , कार्यवाह शंकरराव लासूणे ,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे ,मुख्याध्यापक बाबूराव आडे ,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!