अगा जे घडलेची नाही… ते यावर्षीच्या घोडे माळेगावात यश घडले…?
प्रसिद्ध तमाशा सम्राट व कला _भूषण रघुवीर खेडकर यांची खंत
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
माळेगावच्या तमाशा मंडळातून
लोहा,
१९५६ पासून… आई कांताबाई आणि वडील तुकाराम खेडकर… हे माळेगावच्या यात्रेत दरवर्षी नित्य नियमाने येत असत… व तोच वारसा मी… १९८७ पासून चालवत असून… आत्तापर्यंत कधीही कोणाच्याही तमाशा मंडळावर दगडफेक झाली नाही…. गेटवर त्रास झाला नाही… दादागिरी झाली नाही… की, तमाशा पाहण्यासाठी फुकट सोडा …असे कधीही कोणीही म्हटले नाही… पण, यावर्षी मात्र या सर्व मानवनिर्मित संखटांना आम्हा तमासगिरांना या ‘घोडे माळेगाव’च्या यात्रेत सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याची खंत… कलाभूषण व प्रसिद्ध तमासगिर रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली.
यात्रेकरूंनी दादागिरी करून नुकसान केले..?
रघुवीर खेडकर यांचे वडील तुकाराम खेडकर यांनी… व राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी… दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या या माळेगावची यात्रा वाढवली… लोकप्रिय केली… यात तुकाराम खेडकर यांनी नवनवीन प्रयोग दाखवून यात्रा लोकाभिमुख केली…अफाट जनसमुदायाचं रंजन करत करत प्रबोधनही केले.
पण, यावर्षी मात्र अनेक मानवनिर्मित संकटाना यात्रेत आलेल्या सहा ही तमाशा मंडळांना सामोर जावे लागले आहे… आम्हा तमासगिरांना कसलाही पोलीस बंदोबस्त नाही… लायसन फ्री नाही…जागा फ्री नाही… त्यामुळे आम्हाला ही यात्रा आत्ता परवडत नाही…तर मग इथून पुढे आम्ही यात्रेला कशासाठी यायचे…? भरमसाठ जागेचे भाडे देऊन यात्रेत येणे…ही साधी गोष्ट नाही,..? शिवाय येथे प्रशासनाकडून लाईटची सोय नाही,.. प्रशासनाचे कसलेही आम्हाला सहकार्य नाही… नुकतेच माळेगावच्या यात्रेत आमच्या मंडपाच्या… एका बाजूची कानात यात्रेकरूंनी फाडली… गेटवर येऊन आत तमाशा पाहण्यासाठी फुकट सोडा म्हणून दगड फेक केली ….स्पीकर पाडले… दादागिरी केली… या प्रकारामुळे आम्ही सगळे तमासगिर अस्वस्थ झालो आहोत….मी आज दि. २४ तारखेचा शेवटचा प्रयोग करून… माझ्या काही अडचणी मुळे यात्रेतून काढता पाय घेणार आहे… असे इ.स. २००५ चा महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले रघुवीर खेडकर म्हणाले.

‘कोरोना’ काळ वाईटच होता…!
दरवर्षी आर्ध्याच्या वर महाराष्ट्राची यात्रेच्या निमित्ताने सैर करणारे रघुवीर खेडकर…. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पुढे म्हणाले की… आमच्या तमाशा मंडळात १५०जण आहेत… पैकी स्टेजवर काम करणारे ५२-५३ कलावंत पुरुष आहेत… तर १८महिला कलावंत आहेत…. उर्वरित कर्मचारी हे बॅक स्टेजवळचे आहेत …. ‘कोरोना’ काळ संपल्यानंतर आत्ता कुठे आमचे कार्यक्रम सुरू झाले आहेत… स्टेजवर पाहता क्षणी टाळ्या घेणारे कलावंतांनी कोरोना काळात हामालीची कामे केली… तर गाण्यामध्ये वन्स मोअर घेणाऱ्या गायिकांनी धुणी भांड्याची कामे केली… हा काळ खूप वाईट होता….शासनाने मदत जाहीर केली… पण,ती काही दिली नाही…. मित्रांनी आम्हाला जगवले… या काळात काही कलावंतानी बुट पॉलिश केले… माथाडी कामे केली.
कलावंतांना योग्य वयात मानधन मिळावे ही अपेक्षा…
तमाशा कलावंतांना मानधन जे मिळते ते अंत्यात तोकडे आहे… जे मिळते तेही वयाच्या ६० वर्षांनंतरच्या कलावंतांना मिळते… खरे म्हणजे पुरुष कलावंतांना त्यांच्या वयाच्या ५०शी च्या आत… तर स्त्री कलावंतांना ३५शीच्या आत मानधन मिळाले पाहिजे… योग्य वयात मानधन मिळाले तर ते फायद्याचे आहे… आता सध्या ६० च्या नंतर ए.बी.सी. या वर्गीकरणात २२००,२७०० आणि ३२०० रूपये एवढे तुटपुंजे मानधन मिळते…त्यावर कलावंतांनी कसे जगायचे…?असाही सवाल रघुवीर खेडकर यांनी उपस्थित केला.
यावर्षी पदरात काहीही पडलेले नाही…
यावर्षी माळेगावच्या यात्रेत आम्ही आमची आर्थिक मिळकत बरी व्हावी म्हणून मी … आमच्या तमाशा मंडळाच्या प्रयोगाचे तिकीट कमी केले…ते १००रुपयां वरून ८० रूपयांवर आणले होते… जेणे करून ज्यास्त यात्रेकरू प्रयोग पाहतील… व त्यांचे रंजन होईल… पण, तसे काही झाले नाही…! जागाभाडे देऊन आमच्या पदरात काहीही पडले नाही… अशी खंत सध्या टॉयफाईडच्या आजार असलेले…व त्यांच्यावर माळेगावचे डॉ. वारकड हे उपचार करून… आता ठणठणीत बरे झालेल्या रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली.
आपल्या तमाशा मंडळात गण… गवळण… बतावणी… आणि रंगबाजी सादर केल्या नंतर …’सासरचा विषारी विळखा’…’सूनबाई कुंकू लेऊन जा..’ आणि ‘डोम्या नाग’… हे तीन वगनाट्य क्रमश: ते सादर करतात…४ तास चालणाऱ्या या वग नाट्याला कमीत कमी ७ ते १० हजार पब्लिक असते… असेही ते म्हणाले.
मंदा राणीचे आकर्षण.. आता अमृता खेडकर कडे सरकले !
गेल्या १० वर्षापूर्वी रघुवीर खेडकर … यांची बहीण मंदा राणी… ही वगनाट्याचे मुख्य आकर्षण होती…तिची आदाकरी… शेरोशायरी भुरळ टाकणारी होती… पण, आता वयोमानानुसार त्या मागे पडल्या… असे असले तरीही त्यांच्या तमाशा मंडळात त्या सक्रिय आहेत… मंदा राणीची जागा रघुवीर खेडकर यांच्या स्नुषा अमृता खेडकर यांनी घेतली आहे… मंदा राणीचे असलेले हे आकर्षण आता सरकले आहे…. या बरोबरच बी. बी. पूजा… पायल… सोनाली आणि जया… हेही आकर्षण बनल्या आहेत… सध्या माळेगावच्या यात्रेत कुंदा पाटील पुणेकरसह सिनेतरका रुपाली पाटील… आनंद लोकनाट्य … हिराबाई डोंगरे लोकनाट्य मंडळ … तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे लोकनाट्य… आणि शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य मंडळाचे वगनाट्य यात्रेत दाखल झाले आहेत.
