७६ पैकी ४५ नवनिर्वाचित सरपंचांनी भाजपाचा सत्कार स्विकारला

७६ पैकी ४५ नवनिर्वाचित सरपंचांनी भाजपाचा सत्कार स्विकारला

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण मतदार संघात काँग्रेसवाल्यांनी सर्व सत्तास्थानाची यंत्रणा वापरुन, दडपशाही करुनही निवडणूक झालेल्या ७६ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचापैकी तब्बल ४५ नवनिर्वाचित सरपंचांनी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ. रमेशअप्पा कराड यांच्या संपर्क कार्यालयात येवून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भाजपाचा सत्कार स्विकारला. सत्कार स्विकारलेल्या सरपंच यांच्या गावा-नावासह यादीच भाजपाच्या वतीने सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली आणि काँग्रेसचे धाबे दणाणले.

काँग्रेसनेही सरपंचाचा सत्कार केला या कार्यक्रमात ९८% सरपंच उपस्थित असल्याचा दावा केला होता. हा काँग्रेसचा दावा किती खरा आणि किती खोटा ? असा प्रश्न हजारो जणांना निश्चित पडला असेल यात शंका नाही. काँग्रेसच्या दाव्यानूसार ८१ सरपंच उपस्थित होते. कदाचित हा आकडा लातूर शहर मतदार संघासह सांगितला असेल. लातूर ग्रामीण मतदार संघात ७६ ग्रामपंचायतीची तर लातूर शहर मतदार संघात १३ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. असे एकुण ग्रामीण आणि शहर मतदार संघातील ८९ ठिकाणी निवडणूक झाली. यात काँग्रेसचे जर ८१ सरपंच आले असतील तर भाजपचे आठच सरपंच निवडूण आले असा काँग्रेसने दावा केला.

काँग्रेसने केलेला दावा किती बालीशपणाचा आहे हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही. काँग्रेसचा दावा खराच असेल तर त्यांनी भाजपा प्रमाणे सत्कार केलेल्या सरपंचाची नावासह यादी का प्रसिद्ध केली नाही? काँग्रेसच्या प्रस्तापितांना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी दिलेला धक्का कदाचित सहन झालेला नाही. किमान आपल्या नेत्याकडून पाठ थोपटून घ्यावी, यासाठी त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून साखर कारखान्यासह सत्तास्थानाची सर्व यंत्रणा राबवून गावागावातील काँग्रेसच्या पुढार्‍यांनी आडवणूकीची आणि दडपशाहीची भुमिका घेवून नवनिर्वाचित सदस्यांना भाजपाच्या सत्कार कार्यक्रमास जावू नये. यासाठी जिकरीचे प्रयत्न केले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. उलट लातूर ग्रामीण मधल्या ७६ पैकी ४५ हून अधिक नवनिर्वाचित सरपंचांनी जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते भाजपाचा सत्कार स्विकारुन काँग्रेसचा प्रयत्न हाणून पाडला.

लातूर ग्रामीण मतदार संघात खरच कोणाचे सरपंच किती सरपंच आले हे एकदा आमने-सामने कार्यक्रम आयोजित करुन सिद्धच करायला हवे. तशी हिम्मत काँग्रेसने दाखवायला हवी.

About The Author

error: Content is protected !!