उदगीर मधूनही राष्ट्रीय खेळाडु तयार व्हावेत – माजी मंत्री आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर म्हटले की पूर्वी क्रीडा क्षेत्रामध्ये देश पातळीवर गाजलेले शहर प्रामुख्याने व्हॉलीबॉल साठी महाराष्ट्राच्या संघातून उदगीरच्या अनेक खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले अशा मैदानी खेळा सोबतच इनडोअर खेळात देखील खेळाडू पुढे यावेत, स्टेडियम अभावी प्रयत्न करायला त्यांना अडचण होऊ नये त्यासाठी उदगीर मध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या परिसरात इनडोअर स्टेडियम ची उपलब्धता होत आहे.आपल्या कर्तृत्वाने इनडोअरच्या माध्यमातुन राष्ट्रीय खेळाडु निर्माण व्हावेत असे मत आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या इन डोअर स्टेडियमच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या उपस्थितीत इन डोअरस्टेडियम चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय बॅडमिटन खेळाडू प्रशांत बहात्तरे, आधि सभा सदस्य प्रा. डॉ. महेश बेंबडे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी व ॲड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके ,सदस्य बसवराज पाटील , प्रा. मनोहर पटवारी , ॲड.अजय दंडवते, महादेव नौबदे,मन्मथ बिरादार ,बसवराज पाटील मलकापूरकर ,प्रशांत पेन्सलवार, शिवराज वल्लापुरे, ललिता पाटील, सुभाष धनुरे, गंगाधर दापकेकर ,सरपंच गुरुनाथ बिरादार, प्रवीण भोळे, समीर शेख ,कैलास पाटील, उदय मुंडकर ,बाबुराव आंबेगावे,भालचंद्र घोनसीकर, भरत चामले ,रामराव राठोड श्रीकांत पाटील, प्रा. कैलास पाळणे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. डॉ. महेश वारकडकर व प्रा. अनिल ईगोले ,प्रा. पाळणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले, या स्टेडियम मधून विविध क्रीडाप्रकार, खेळाची मैदाने, प्रेक्षागृह अशा सुविधा उभारल्या असून येथून देश-विदेश पातळीवर नाव लौकिक कमावणारे खेळाडू व्हावेत, अशी शुभेच्छा दिली. व मतदार संघात होत असल्या विविध विकास कामाचा सविस्तर आढावा घेतला .महाविद्यालयाच्या नियोजित ट्रॅक साठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.
समारोपात मानकरी म्हणाले आ.बनसोडे यांनी या महाविद्यालयाच्या विकासासाठी सदैव सकारात्मक भूमिका घेतली असून यापुढील काळात सुद्धा ती अशीच मदत करून महाविद्यालयाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करून ते या कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार व्यक्त करून शुभेच्छा दिला. क्रीडा विभागाचा अहवाल क्रिडा संचालक प्रा.डॉ.सतीश मुंडे यांनी सादर केला. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. बी .एम .संदीकर, यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.आर. के. मस्के यांनी केले. आभार प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी मानले.
