देशी दारू व वाहनासह 4 लाख 7 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात अवैध पद्धतीने अनेक धंदे चालत आहेत, हे धंदे थांबले पाहिजेत, याला आळा बसला पाहिजे. या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आपल्या परीने प्रयत्न करत आहेत तशा सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. असे असले तरीही स्थानिक पोलीस म्हणावे त्या गतीने काम करत नसल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला याबाबत सक्रिय व्हावे लागत आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर दारू विकणारे यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु आहे.पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा डॉ. दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही करण्याकरिता विविध पथके तयार करण्यात आले होते.
दिनांक 24/12/2022 रोजी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे देवणी हद्दीत विनापरवाना देशीदारूची अवैध विक्री,व्यवसाय करण्यासाठी वलांडी शिवारातून टाटा सुमो वाहनामधून देशीदारूची वाहतूक होत असताना सदर पथकाने सापळा लावून छापा मारला असता, तेथे देशीदारूचे 1536 बाटल्या किंमती-1,07,520/- रूपयेची बेकायदेशररित्या देशी दारू आणि एक टाटा सुमो वाहन असा एकूण 4,07,520/- रुपयेचा देशीदारूचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असताना मिळून आला असून सदर प्रकरणी इसम नामे पांडुरंग शिवाजी बिराजदार, (वय 40 वर्ष ,राहणार इस्लामवाडी, तालुका देवनी जिल्हा लातूर) याचे विरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 305/2022, कलम 65(अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास देवणी पोलीस करत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात,पोलीस अंमलदार सचिन मुंडे, बालाजी जाधव, रवि कानगुले यांनी केली आहे.
