पंतप्रधानाचे आत्मनिर्भर व कौशल्य विकासाचे स्वप्न मातृभूमीतून साकार होत आहे – खा. शृंगारे

पंतप्रधानाचे आत्मनिर्भर व कौशल्य विकासाचे स्वप्न मातृभूमीतून साकार होत आहे - खा. शृंगारे

उदगीर (एल.पी.उगीले) : आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मातृभूमी महाविद्यालयातून चालू असलेल्या व्यवसायीक शिक्षणातून व कौशल्य विकासातून दिसत आहे. पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांचे आत्मनीर्भर भारतचे स्वप्न ग्रामिण भागातून पुर्ण होत आहे ,असे प्रतिपादन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले. ते मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालयात आयोजित सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

यावेळी मंचावर माजी आ. सुधाकर भालेराव, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे, भाजपा युवा मोर्चाचे उदगीर शहराध्यक्ष मनोज पुदाले, बाळासाहेब पाटोदे,पप्पू गायकवाड , माजी नगरसेवक आनंद बुंदे, भाजपा जळकोट तालुकाध्यक्ष केंद्रे आदिची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना खा.सुधाकर शृंगारे म्हणाले की,समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी भाजपा कटीबद्घ असुन लातूर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्रिय रस्ते विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ६८कोटीचे रस्ते मंजूर झाले असुन या मुळे विकासाला गती मिळणार आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नामुळे उदगीर जळकोट तालुक्यात रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याने मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपाचे शहराध्यक्ष सतीश ऊस्तुरे यांच्या वतीने खा. सुधाकर शृंगारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मातृभूमी महाविद्यालयात कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सरी स्कूलचे कर्मचारी, विद्यार्थी तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. बिभीषण मद्देवाड यानी केले, तर आभार प्रा. रुपाली कुलकर्णी यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!