आर्यसमाजाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगिले) : आर्यसमाजाच्या मुशीतून संसकारित झालेले व येथील महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना अमेरिकेतील सेंट्रल युनिव्हर्सिटी कडून डी. लिट. ही मानद पदवी मिळाल्यामुळे त्यांचा महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा परळी व आर्यसमाज उदगीरच्या वतीने प्रा. अर्जुनराव सोमवंशी व डॉ. नयनकुमार आचार्य यांच्या शुभहस्ते गौरवचिन्ह, शॉल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
उदगीर येथील आर्यसमाज येथे महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व उदगीर आर्यसमाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हुतात्मा श्रद्धानंद स्वामी व हु. भाई श्यामलालजी यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून हैदराबाद मुक्तिसंग्राम व मराठवाडा मुक्तिदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पार्श्वभूमीवर सर्वश्री नामदेव मामा चामले, ज्ञानोबा चामले, सर्वश्री प्रभुराव डोईजोडे यांच्यासह इतर थोर स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार व प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना डी. लिट. ही मानद पदवी अमेरिकेच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीने प्रदान केली असल्याने त्यांचाही सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अध्यक्षस्थानी आचार्य पं. मनुदेवजी आर्य, गाजियाबाद हे होते तर महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा परळीचे प्रधान योग मुनी, मंत्री राजेंद्र दिवे, उपमंत्री प्रा. अर्जुनराव सोमवंशी, प्रा. डॉ. नरेंद्र शास्त्री हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे शिल्पकार गुरूवर्य प्रा. अर्जुनराव सोमवंशी व वैदिक साहित्याची सैद्धांतिक मांडणी करणारे ‘वैदिक गर्जना’ या मासिकाचे कार्यकारी संपादक प्रा. डॉ. नयनकुमार शास्त्री यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह,शॉल, श्रीफळ व पुष्पहाराने गौरविण्यात आले. तसेच यावेळी माउली प्रकाशनाने सिद्ध केलेल्या प्रा. डॉ. नरेंद्र शिंदे व सौ. मधुमतीताई शिंदे यांच्या ‘ईशोपनिषद व संस्कृत सुभाषितस्तवक’ या दोन ग्रंथांचे आचार्य पं. मुनिदेवजी आर्य यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पं. धर्ममुनी, पं. विज्ञानमुनी, पं.आर्यमुनी तसेच उदगीर आर्यसमाजाचे प्रधान प्रा. बाबुराव नवटक्के, मंत्री प्रा. डॉ. नरेंद्र शिंदे, अजितकुमार सरसंबेजी, उदगीरच्या आर्य वीर दलाचे अध्यक्ष सुबोध आंबेसंगे, सचिव, बलराज कंधारे, कोषाध्यक्ष, नामदेव आपटे, व्यंकटेश हालिंगे, सेवा निवृत्त मुख्याध्यापक भाऊराव अहमदाबादे, प्रा डॉ.सोमदेव शास्त्री, रामचंद्रजी गरड, प्रतापसिंह चव्हाण, ओम चव्हाण, संध्याताई बेद्रे,सुमनदेवी चव्हाण, घोणसीकर, प्रकाशक गोविंद मुक्कनवार प्रा. नाईक, सतीश मगदाळे, सुधीर तोंडचिरकर,भरत कोयले, यांच्यासह अनेक ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अर्जुनराव सोमवंशी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ.नरेंद्र शिंदे यांनी केले तर आभार बलराज कंधारे यांनी केले. यावेळी हैदराबाद, हादगाव, देगलूर, होट्टल, शिवणी, लातूर, परळी, गुंजोटी, धाराशीव, उदगीर या व इतर भागातून जवळपास दोनशेच्या वर आर्यप्रेमी विद्वान महिला व बांधवांची उपस्थिती होती.
