अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सुशासन दिन साजरा

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सुशासन दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सुशासन दिन साजरा करण्यात आला.
याबाबतची सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागातील प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे हे होते तर, डॉ. सतीश ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. या कार्यक्रमास बाळासाहेब कराड, सिद्धार्थ ससाणे, अर्चना आंधळे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!