गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : आ.बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर – चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ता. येथील इंद्रायणी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि पॅनल प्रमुखांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांचा यथोचित सन्मान केला.
प्रसंगी किनगाव, झरी (बु.) चापोली, अलगरवाडी, गंगाहिप्परगा, मष्णेरवाडी, सोनखेड – मानखेड – पाटोदा, कलकोटी, आनंदवाडी, डोंग्रज, महांडोळ – सांडोळ, मोहदळ, रायवाडी, रामवाडी, आष्टा, सांगवी, रोकडा सावरगाव, कोपरा, लांजी – तांबटसांगवी, बाभळदरा, आजनी खु. आजनीवाडी, रूद्धा, हाळणी, बेलगाव, लेंडेगाव- वैरागड – बोरगांव, मावलगाव, वळसंगी, जठाळा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पॅनल प्रमुख उपस्थित होते.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार या नात्याने माझे सर्वांना सहकार्य असणार आहे. विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मत आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सभापती शिवानंद हेंगेने,जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ, तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी जि प सदस्य सुदर्शनजी मुंडे,अनिलराव वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
