मराठवाडास्तरीय लालबहादूर शास्त्री आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

मराठवाडास्तरीय लालबहादूर शास्त्री आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

विविध गटातून 75 हजार रुपयांची भरघोस पारितोषिके

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री शैक्षणिक संकुलात मागील 42 वर्षापासून अखंडितपणे लालबहादूर शास्त्रीजींच्या स्मरणार्थ मराठवाडास्तरीय आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या ऐतिहासिक व सुप्रसिद्ध स्पर्धेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार ,कार्यवाह शंकरराव लासूणे,प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष व्यकंटराव गुरमे,मुख्याध्यापक बाबूराव आडे,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले,स्पर्धा प्रमुख सचिन यतोंडे,शरद पवार ,अनिता यलमटे ,गुरूदत्त महामुनी,संतोष कोले यांच्या शुभहस्ते सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावर्षी ही स्पर्धा दि.11 व 12 जानेवारी 2023 रोजी आॕफलाईन संपन्न होईल. विविध गटातून सुमारे 75 हजार रूपयांची भव्य पारितोषिके वितरीत करणारी ही मराठवाड्यातील एकमेव स्पर्धा आहे. ही स्पर्धा इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येक शाळेने एक संघ सहभागी करावयाचा आहे.या स्पर्धेत एका स्पर्धकांने विषयाच्या अनुकूल बाजूने व दुसऱ्या स्पर्धकाने विषयाच्या प्रतिकूल बाजूने विषय मांडणी करणे बंधनकारक आहे.या स्पर्धेचा यावर्षीचा विषय-“शैक्षणिक स्पर्धा बालपण हिरावून घेत आहे /नाही.” असा आहे. मराठवाड्यातील सर्व संस्कारकेंद्रप्रमुखांनी आपला संघ या सुप्रसिद्ध स्पर्धेत सहभागी करावा असे आवाहन माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सतनप्पा हुरदळे,मुख्याध्यापक बाबूराव आडे,अंकूश मिरगुडे,श्रीपाद सीमंतकर यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!