हडोळती येथील मुस्लिम समाजाच्या शादीखाण्याचे काम लवकरच मार्गी लावू – आमदार बाबासाहेब पाटील

हडोळती येथील मुस्लिम समाजाच्या शादीखाण्याचे काम लवकरच मार्गी लावू - आमदार बाबासाहेब पाटील

हडोळती (गोविंद काळे) : हडोळती ता. अहमदपूर येथील शिष्टमंडळाने आज पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेबजी पाटील साहेबांची भेट घेवून मुस्लिम समाजासाठी शादिखाण्याची मागणी केली. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शादीखान्याचे लवकरच काम मार्गी लावण्याचे आश्वासन साहेबांनी दिले. यावेळी आमदार साहेबांचा शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी चेअरमन अभिनव पवार, सरपंच शकुंतला भोगे,उपसरपंच माधव पवार, पोलीस पाटील बालाजी मिरकले, ग्रा.प. सदस्य रज्जाक टेलर, ग्रा.प. सदस्य महामुद पठाण, ग्रा.प. सदस्य प्रदिप नायने, नामदेव कलवले, राम मुळके, फरुकबी मणियार या सदस्यांसह एहसान भाई सय्यद, साजीद भाई वलिमिया, उस्मान खुरेशी, राष्ट्रवादी चे कार्यकर्ते भीमाशंकर जाभाडे,मुसा सय्यद, माजीद शेख, जानम शेख, रज्जाक शेख मिस्त्री, शमशू मणियार, महेबुब टेलर, मोहरम कमिटी चे सदस्य उस्मान पीरसाब शेख,पिंटू भोगे,जाविद पिंजारी, चांदपिर सवारी सचिव शाकीर आंबेगावे, सवारी प्रमुख सुलतान शेख, अरबाज महामुद पठाण, अजीम मणियार, प्रल्हाद मोरे, आदिल शेख, इरफान शेख यांच्यासह असंख्य गावकरी उपस्थित होते.

About The Author