बांधकाम मजुरांचे प्रमाणपत्र विना अडचण द्या…!!
अहमदपूर (गोविंद काळे) : बांधकाम मजूर कामगारांची नोंदणी प्रमाणपत्र देताना कार्यालयात येणार्या मजूरांची हेळसांड न करता अनावश्यक कागदपत्रे न घेता प्रमाणपत्रे द्यावे अशी आग्रही मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर व युवकनेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुख्याधिकारी न.प.अहमदपूर यांच्या कडे केली आहे.
शहराच्या अंतर्गत बांधकाम मजूर कामगार म्हणून काम करणार्या मजूरांची कामगार कार्यालयाकडे नोंदणी करून विविध लाभ दिले जातात.या साठी नोंदणी कृत कंत्राटदार व मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र लागते.परंतू असू प्रमाणपत्र देताना अनावश्यक कागदपत्रे मागवून कामगारांची हेळसांड केली जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याने एका शिष्टमंडळासह मुख्याधिकारी यांची भेट घेवून लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी कार्यालय अधिक्षक सतिश बिल्लापट्टे यांना निवेदन दिले. या वेळी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर,जेष्ठ कामगार नेते अण्णाराव सूर्यवंशी, विठ्ठल तरडे, शरद शिंदे,अजय कांबळे, शिलाताई शिंदे आदींची उपस्थिती होती.