ढाब्यांवर मद्यप्राशन करण्यांविरुध्द ढाबा मालक व इतर जणांवर कडक कारवाई
लातूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप आयुक्ता श्रीमती उषा वर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव गो. राऊत, राउशु, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३१/१२/२०२२ वर्षाअखेरीच्या पार्श्वभुमीवर लातूर शहरातील खंडेराया ढाबा, स्वर्ग ढाबा तसेच अहमदपूर शहरामध्ये हॉटेल न्यु तात्या लंच होम व साई लंच होम येथे विभागामार्फत कलम ६८ व ८४ अन्वये एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये चार ढाबा मालकांसह ५९ मद्य पिणा-या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयांमध्ये ४ लिटर विदेशी दारु, ०२ लिटर बिअर असा एकूण रु. ३०४००/- रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरच्या कारवाईमध्ये अधीक्षक राठशु लातूर श्री. केशव राऊत, निरीक्षक लातूर विभाग श्री. आर. एम. बांगर, निरीक्षक उदगीर विभाग, विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री. लीलाधर पाटील व स्टाफ तसेच लातूर-उस्मानाबाद भरारी पथकाचे निरीक्षक श्री. तानाजी कदम व स्टाफ आणि श्री. आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक श्री. एल. बी. माटेकर, श्री. अमोल शिंदे, श्री. स्वप्नील काळे, श्री. ए. बी. जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. गणेश गोले, श्री. अनंत कारभारी, जवान श्री. – अनिरुद्ध देशपांडे, श्री. सुरेश काळे, श्री. श्रीकांत साळुंके, श्री. ज्योतीराम पवार, श्री. हनमंत मुंडे, श्री. संतोष केंद्रे, श्री. एकनाथ फडणीस यांनी सहभाग नोंदविला.
कोणाहि व्यक्तीनं विना मद्यप्राशन परवाना मद्यप्राशन खरेदी अवथा सेवन केल्यास सदर व्यक्तीविरुद्ध असेच गुन्हे नोंदविले जातील याची दक्षता नागरीकांनी घ्यावी. लातूर जिल्हयात अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा- याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे श्री. केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.
