सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय ग्राहक सप्ताह निमित्त निबंध व घोषवाक्य स्पर्धा संपन्न

सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय ग्राहक सप्ताह निमित्त निबंध व घोषवाक्य स्पर्धा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालय कुमठा (बु.) येथे राष्ट्रीय ग्राहक सप्ताह निमित्य निबंध आणि घोषवाक्य स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे इतिहास विभाग प्रमुख पुठ्ठेवाड व्ही.जी.उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून जवळे ज्ञानेश्वर आणि कांबळे यु .आर. उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक शिंदे जी.आर तसेच पर्यवेक्षक वाघमारे एम.बी. ,प्राध्यापक पटवारी बी .एस. व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी जवळे डी.आर. आणि कांबळे यु.आर यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन आणि राष्ट्रीय ग्राहक सप्ताह याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच या सप्ताहात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य स्वरूपात राष्ट्रीय ग्राहक दिन या विषयावरील निबंध आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले गेले. या निबंध स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी गटात केतकी सुरेश पाटील प्रथम, शेख इस्माईल द्वितीय, तर कदम कार्तिक तृतीय आला. आठवी ते दहावी गटात शेख महंमद, कौडगावे प्रतीक प्रथम, हांडगिरे ऋतुजा ,माने स्वप्निल द्वितीय, तर कदम साक्षी ही तृतीय आली. घोषवाक्य स्पर्धेमध्ये सूर्यवंशी गजानन, हांडगिरे ऋतुजा हे प्रथम, तिगाेटे संविधान ,तिगाेटे प्रकाश द्वितीय, तर कांबळे मल्हारी ,माने चेतन, नामवाड समाधान यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या निबंध स्पर्धेतील व घोषवाक्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा भव्य असा गुणगौरव शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात पुठेवाड व्ही.जी. यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन केले. व ग्राहकांची हक्क व कर्तव्य ही सांगितली. कार्यक्रमाचा शेवट ग्राहक सहकार गीताने कदम संगीता हिने केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार शुभम याने केले तर आभार प्रदर्शन वाघमारे संघर्षा हिने केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील चित्रकला शिक्षक हलकंचे डी.डी., सर्व शिक्षक ,ग्रंथपाल निला आर.एस. तसेच वरिष्ठ लिपिक माने जे‌. व्ही आणि शाळेचे सेवक हंकारले एस .पी. यांनी व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!