पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी

पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी

रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रजतकुमार खाडे यांची मागणी

महागांव (प्रतिनीधी) : महागांव – पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस कार्यक्रम राबविण्याची मागणी प्राथमिक आरोग्य केंद्र महागांव येथिल रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रजतकुमार खाडे यांनी जिल्हाधिकारी एम डी सिंग यांच्याकडे तहसिलदार नामदेव ईसळकर यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली . याबाबत तहसिलदार यांना निवेदन दिले .पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जातात कोरोना संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या प्रमाणेच पत्रकारांनी ही फ्रन्टलाइनला राहून लोकसेवा केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर असतांना पत्रकार ग्राउंडवर होते खरी वस्तुस्थिती व माहिती जनतेपर्यंत सातत्याने पोहचवत होते. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाचे सर्व प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवत होते. सर्वसामान्य जनता व शासन – प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांनी या कालावधीत प्रचंड मेहनत घेऊन काम केलेले आहे. अनेक पत्रकारांनाही कोरोनासारखा दुर्धर आजार झाला. आता शासनामार्फत फ्रन्टलाइनला काम करणाऱ्या घटकांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. नर्सेस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, महसूल, शासकीय कर्मचारी यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम संपत आला आहे. पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते ह्यांना मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम तातडीने आयोजित करावा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील काम करणाऱ्यांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस तातडीने मिळावी या करीता सर्व तालुक्यांमध्ये याबाबत आरोग्य विभागाला कॅम्प, शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरुन द्याव्यात अशी मागणी सुद्धा रजतकुमार खाडे यांनी केली. ग्रामीण भागातील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात प्रचंड योगदान दिले आहे. संपूर्ण कोरोना काळात जिल्हा प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. भविष्यात या संकटाच्या काळात सहकार्याची भूमिका आहे. निवेदनाची दखल घेऊन आपण तातडीने मोफत कोरोना प्रतिबंधक लस पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यावी हि विनंती रजतकुमार खाडे यांनी केली आहे. यावेळी पञकार ओम देशमुख, सदानंद जाधव, रवि वाघमारे, अंकुश कावळे व स्वप्निल नरवाडे आदि उपस्थित होते.

About The Author