कासारगाव हणमंतवाडी च्या उपसरपंचपदी सौ. पुष्पा नंदकिशोर मोहिते यांची बिनविरोध निवड

कासारगाव हणमंतवाडी च्या उपसरपंचपदी सौ. पुष्पा नंदकिशोर मोहिते यांची बिनविरोध निवड

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील कासारगाव व हणमंतवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत नंदकिशोर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातुन निवडणुक लढवण्यात आली होती. यामध्ये गावकर्यांनी परिवर्तन ग्रामविकास पॅनलला सरपंच पदासह स्पष्ट बहुमताने निवडुन दिले. दि. 4 जानेवारी रोजी सरपंच सौ. शकुंतला बालासाहेब गाडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये उपसरपंचपदी सौ. पुष्पा नंदकिशोर मोहिते यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून करमले बी. आर., ग्रामसेवक उत्तम गोमसाळे यांनी काम पाहिले. तसेच यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्य सौ. अंजली समाधान कोटंबे, सौ.छाया राजाभाऊ भोळे, श्याम सूर्यभान केळे, सौ. रत्नमाला जयदेव मोहिते, सौ. पार्वती शेषराव ठोक, पृथ्वीराज दयानंद मोहिते, लक्ष्मण रावसाहेब सपाटे, संभाजी ज्ञानोबा कांबळे उपस्थित होते.

कासारगाव हणमंतवाडी च्या उपसरपंचपदी सौ. पुष्पा नंदकिशोर मोहिते यांची बिनविरोध निवड

या निवडी प्रसंगी मधुकर गोविंदराव मोहिते, जीवन विश्वंभर मोहिते, राम नामदेव मोहिते, नंदकिशोर सुधाकरराव मोहिते, बालासाहेब भगाडे, यज्ञकांत मोहिते, विनोद दिवे, सतीष मोहिते, आत्माराम भोसले, मोहिते रमाकांत सर, काकासाहेब भगाडे, उत्तम भोसले, गोपाल भंडे, शरद भंडे, सुनिल मोहिते, अनिल मोहिते, कल्याणराव लांडगे, भारत मोहिते, विनायक मोहिते, राजाभाऊ मोहिते, संतोष जगताप, पांडुरंग मामडगे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

About The Author

error: Content is protected !!