जिल्ह्यात 242 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
एका रुग्णाचा मृत्यू
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात 242 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.
लातूर जिल्ह्यात 1652 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 117 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 261 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 2007 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 125 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27656 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 1622 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 719 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 25315 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 83 आहे.