आर्थिक उन्नतीसाठी शेतकर्‍यांनी रेशीम लागवड करावी – विष्णु कलमे

आर्थिक उन्नतीसाठी शेतकर्‍यांनी रेशीम लागवड करावी - विष्णु कलमे

उजना (गोविंद काळे) : वेळोवेळी बदलणारे हवामान, किडींचा प्रादुर्भाव शेतीमालाचे भाव आदीच्या मुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असुन पुढील काळात रेशीम लागवड करुन शेतकरी आर्थीक उन्नती साधु शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी रेशीम लागवड करावी असे अवाहन कृषी सहाय्यक विष्णु कलमे यांनी केले. ते अहमदपुर तालुक्यातील नागझरी येथे पोकरा अंतर्गत शेतीशाळेत बोलताना सांगीतले. यावेळी ग्रामसेवक सरपंच, उपसरपंचांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

या शेतीशाळेत रेशीम लागवड विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ज्या शेतकर्‍यांना रेशीम लागवड करण्यास इच्छुक आहेत त्यांनी ७/१२, ८अ, पासपोर्ट छायाचित्र आणी रजिस्ट्रेशन फी संबंधीत कृषीसहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे २१ मार्च पर्यंत संपर्क करावा.

About The Author