शिरूर ताजबंद; गावठाण नकाशासाठी ड्रोन द्वारे सर्वेचा शुभारंभ

शिरूर ताजबंद; गावठाण नकाशासाठी ड्रोन द्वारे सर्वेचा शुभारंभ

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत भूमिअभिलेख विभाग,ग्रामविकास खाते व सर्वे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील गावठाच्या नकाशासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुधाम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे ड्रोन द्वारे सर्वेचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे,तहसीलदार प्रसाद कुलकर्णी,तालुका भूमी अधीक्षक आर.के.डावरे, डी.जी.कुलकर्णी, तलाठी शाम कुलकर्णी,सरपंच पडोळे,उपसरपंच प्रताप पाटील,पाणीपुरवठा सभापती रणधीर पाटील,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बिलापट्टे, ग्रामपंचायत सदस्य जयवंत सगर, पत्रकार बालाजी पडोळे, पत्रकार धर्मपाल सरवदे, मल्लिकार्जुन स्वामी, लिपिक तोफिक किनिवाले,मारोती सरवदे, गंगाधर बैकरे यांच्या सह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. ह्यावेळी उपस्थिती मान्यवरांचा ग्रामपंचायत कार्यालयाचा वतीने सत्कार करण्यात आला.

या गावठाण सर्वे अंतर्गत प्रत्येक घराची लांबी,रुंदी व एकूण क्षेत्राची मोजणी होणार असून गावातील प्रत्येक घरास पी.आर.कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्र मिळणार असल्याची माहिती परिवेक्षक भूमापक व्यंकटेश बिराजदार यांनी दिली. गावठाण नकाशासाठी ड्रोन द्वारे होणाऱ्या सर्वेच्या शुभारंभाचे प्रस्तावित व आभार उपसरपंच प्रताप पाटील यांनी मानले.

About The Author