डॉ.शिवाजी गायकवाड यांची जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समिती पदी नियुक्ती

डॉ.शिवाजी गायकवाड यांची जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समिती पदी नियुक्ती

लातूर (प्रतिनिधी) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्र , नवी दिल्ली यांच्या वतीने प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांची जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समिती पदी सदस्यपदी निवड करण्यात आली असून यानिमित्त नेहरू युवा केंद्र लातूर यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजित करण्यात आला होता.

प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी जिल्ह्यातील युवा विकासाच्या क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून व युवा चळवळींना चालना देण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. विद्यार्थी हिताय अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रियतेने सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे कार्य अनेक कालखंडापासून ते करत आले आहेत. या कार्याची दखल घेत मा .लातूर जिल्हाधिकारी यांनी त्यांची सल्लागार सदस्यपदी निवड केली आहे.

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समिती पदी निवड झाल्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहांमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती साक्षी समय्या यांच्या हस्ते प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.संतोष पाटील, कार्यक्रमाधिकारी प्रा.विलास कोमटवाड प्रा.महेश जंगापल्ले आदी उपस्थित होते. जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार नियुक्त बदल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!