प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या हिवरा गावाला दिलासादायक बातमी; ४७ पॉझिटिव्ह रुग्णांनी केली कोरोनावर मात
महागाव (राम जाधव) : महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात शिरकाव केला होता. तर मोठ्या प्रमाणात कोरोनाने थैमान घातलेल्या हिवरा संगम येथे कोरोनाबाधितांचा आकडा ५० वर गेला होता. परंतु कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली आहे मागील दोन दिवासाआधी ८ कोरोना रुग्णाना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दिनांक २० मार्च शनिवारी रोजी सायंकाळी ३९ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे आरोग्य प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली.
सुरुवातीला एकही कोरोना रुग्ण नसणाऱ्या हिवरा येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत होती आणि काही दिवसांनी तर कोरोना बाधितांचा आकडा५० वर पोहचला होता आणि तालुक्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण बाधित रुग्ण वाढत असलेल्या हिवरा गावात मात्र आता रिकव्हरी रेट वाढला असून गावाची वाटचाल कोरोनामुक्ती कडे होत आहे.
उपचार घेतलेल्या रुग्णाच्या शरीरात कोरोना संबंधित कुठलेही लक्षणे आढळले नाही अश्यानाच डिस्चार्ज दिला जात असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.तर हिवरा येथील श्री एकविरा देवी संस्थान तर्फे कोव्हिडं सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या ५० पैकी ४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून या रुग्णाची दररोज आरोग्य विभागाच्या मार्फ़त काळजी घेण्यात आली. मागील १४ दिवसापासून सुरू असलेल्या कोरोनारुग्ण संख्येला नियंत्रणावर आण्यासाठी व्यापारी वर्ग व दुकानातील कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली सोबतच व्यापाऱ्यांनी दर पंधरा दिवसाला कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करावा असे आव्हान आरोग्य प्रशासनाने केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन समिती व कोव्हिडं सेंटरच्या स्वयंसेवकाचे कौतुक –
वाढत असलेल्या कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता व त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गावातच श्री एकविरा देवी संस्थांच्या वतीने मंगलकार्यालयात कोव्हिडं सेंटर करण्यात आले आहे.तर तेथील सर्व व्यवस्था विश्वस्थ मंडळाकडून व लोकवर्गणीतून करण्यात आली. गावातील युवकांनी कोव्हिडं सेंटर येथे दिवस रात्र सेवा दिली व आपत्ती व्यवस्थापन समितीने तीन दिवसीय जनता कर्फ्यु घेतला असल्याने मानवी साखळी तुटून कोरोना रुग्ण संख्येत घट झाली असून समितीने योग्य ते निर्णय घेऊन खूप चांगली कामगिरी केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समिती व कोव्हिडं सेंटरला स्वयंसेवकांनी सेवा दिली त्याबद्दल स्वयंसेवकाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.