लातूर पोलीसांची गुजरात येथील गोध्रा मध्ये जावुन धडक कारवाई – १४,१६,०७२/- रुपयांचा मुद्येमाल जप्त

लातूर पोलीसांची गुजरात येथील गोध्रा मध्ये जावुन धडक कारवाई - १४,१६,०७२/- रुपयांचा मुद्येमाल जप्त

अमित तिकटे

लातूर : दि.१०/०३/२०२१ रोजी पोस्टे एमआयडीसी लातूर येथे फियादी सुहास बापुराव पाचपुते वय ४९ वर्ष रा. लक्ष्मी कॉलनी, लातूर यांनी फिर्याद दिली की, माझे श्री मोरया इन्फ्रा सोल्युशन्स अॅन्ड व्हेनचर्स प्रा.लि.या कंपनीचे गोडावुन असुन सदर गोडावुन मध्ये हिन्दुस्थान युनिलिव्हर या कंपनीसोबत डीस्ट्रीव्युटर शीप अन सदर कंपनीचा तयार माल मी छोटे मोठे रेणापुर तालुका लातूर ग्रामीण व औसा दुकानदारांना विक्री करतो. सदरचे गोडावुन दि.९/३/२०२१ रोजी रात्री १०.४५ ते दि.१०/३/२०२१ रोजी पहाटे ०४.४० वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने गोडावुन फोडुन त्यामधील वेगवेगळ्या कंपनीचे साबन, कॉफी,चहापत्ती,क्रिम, सॉस असा एकुण ९,८४,१५०/-रुपयाचा माल चोरुन नेला. वगैरे फिर्यादी वरुन पो.स्टे.एमआयडीसी लातूर येथे गुरनं १७६/२०२१ कलम ४५७,३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/जी.बी.कदम यांचेकडे देण्यात आला.

सदर गुन्हयाच्या तपासासाठी वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली पोउपनि जी. वी.कदम व पोउपनि के.बी.नेहरकर यांच्या नेतृत्वाखाली दोन टिम करण्यात आल्या. गुन्हयाच्या तपासा दरम्यान गोपनिय व तांत्रिक माहीतीचे विश्लेषन करुन सदर गुन्हयातील वापरण्यात आलेला ट्रक क्रमांक जी.जे.३१ टी ३७१० निष्पन्न करुन सदर ट्रक गुजरात मधील गोध्रा येथे असल्याची माहीती मिळालेवरुन वर नमुद तपास पथक गुजरात येथील गोध्रा येथे गेले व स्थानिक पोलीसांच्या मदतीने गुन्हयात गेला माल, आरोपी नामे मोहसीन जियाओदीन टपला वय ३० वर्ष व्यवसाय ड्रायव्हर रा. उडणबाजार ता.गोध्रा ता.पंचमहल राज्य गुजरात यास नमुद ट्रकसह ताब्यात घेतले. आरोपी कडुन १४,१६,०७२/- रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयातील इतर आरोपीचे नाव निष्पन्न झाले असुन त्यांचा शोध चालु आहे.

सदर कामगिरी मा निखील पिंगळे पोलीस अधीक्षक ,लातुर, श्री.हिम्मत जाधव अपर पोलीस अधिक्षक,लातूर, श्री.जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री गजानन भातलंवडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, लातूर, श्री संजीवन मिरकले पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे एमआयडीसी नेतृत्वाखाली जी.बी. कदम, के बी . नेहरकर पोलीस उपनिरीक्षक यांनी त्याचे पथकातील पोलीस अमंलदार राजेंद्र टेकाळे, राजाभाऊ मस्के, युवराज गिरी, सिध्देश्वर मदने, निलेश जाधव , मदार बोपले यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

About The Author