नराधमांना त्वरीत अटक करून पिडीतेला न्याय द्यावा अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल – प्रा. गोविंद शेळके
अहमदपूर येथे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा व सर्व परिवर्तनवादी संघटनेची पत्रकार परिषदेतील माहीती
अहमदपूर (गोविंद काळे) : कोपरा येथील प्रकरणात नराधमांना त्वरीत अटक करून पिडीतेला न्याय द्यावा अन्यथा समाज परिवर्तनवादी संघटना रस्त्यावर उतरेल अशी माहीती अहमदपूर येथील लक्ष्मीनारायण मंदीरात कोपरा प्रकरणी आयोजीत केलेल्या मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा व सर्व परिवर्तनवादी संघटनेच्या पत्रकार परिषदेत मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके यांनी दिली.
पुढे बोलताना प्रा. शेळके म्हणाले की, शिवरायांच्या व भिमरायांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दररोज माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटनांचा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून मला अतिशय खेद वाटतो. वैऱ्याच्याही बाई लेकीवर असा क्रुर प्रसंग येऊ नये. पिडीतेकडून मिळालेल्या माहितीनुसार जाणीवपूर्वक कट रचुन अतिक्रमणाचे कारण पुढे करून सत्तेच्या जोरावर मुजोर झालेल्या सरंपच, उपसरपंच, ग्रामसेवक व त्यांचे भाडोत्री गुंडानी एका २३ वर्षीय विद्यार्थीनीना मारहान करीत तिचा विनयभंग केल्याचे पिडीतेने सांगितले आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना असून पिडीते सोबत जी घटना घडली ही घटना पिडीतेचे आयुष्य बर्बाद करुन गेले.पिडीतेला वैद्यकीय उपचाराची गरज असून झालेल्या बदनामीमूळे पिडीते पुर्नवसन होण्याची आवश्यकता आहे. हे पुर्नवसन कोण करणार? पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच की पिडीतेला न्याय मिळवून देण्याचा असून त्या नराधमाने मोबाईल मध्ये व्हिडीओ क्लिप केलेली आहे. एका आबलेला जिवणातून उठवणाऱ्या नराधमांचा शोध घेऊन त्वरीत अटक करावी व पिडीतेला न्याय द्यावा. अन्यथा सामाजीक परिवर्तनवादी संघटनाच्या वतीने शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. समाजातील कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा टिकवून ठेवावा. जाती -जाती मध्ये तेढ निर्माण करू नये. हा लढा कोणत्या जाती विरूद्ध नसुन प्रवृत्ती विरुद्ध आहे.
या पत्रकार परिषेदेस मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक चापटे, शहराध्यक्ष प्रा.नाना कदम, उपाध्यक्ष दत्ता कदम, पिडीत मुलीचा भाऊ, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, जगदीश जाधव, डि.के.जाधव, संभाजी ब्रिगेड चे विधानसभा अध्यक्ष बालाजी कदम जवळगेकर, प्रा.मारोती बुद्रूक पाटील, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडचे माने, यासह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व नागरीक आदीची उपस्थिती होती.