दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीरमणजी लाहोटी तर सचिवपदी रमेश बियाणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नियामक मंडळ व विश्र्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया संपन्न झाली. दयानंद शिक्षण संस्थेच्या विकासात महत्वाचे योगदान देणारे नियामक मंडळ व विश्र्वस्त मंडळाची निवड अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली. सर्व नूतन पदाधिकार्याच्या निवडी बिनविरोध झाल्या. संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, लालितकुमार शहा, रमेश राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव, सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, सहसचिव रामराव पाटील, ॲड. श्रीकांत उटगे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरात सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीस मान्यता दिली.
नूतन कार्यकारणी सदस्य म्हणुन डॉ. चेतन सारडा, अँड आशिष बाजपाई, श्री.मकरंद सावे, श्री. दीनानाथ भुतडा, डॉ रवींद्र राठी, श्री.दिनेश इन्नानी, श्री.बालकिशन बांगड, श्री.अजिंक्य सोनवणे, श्री.विशाल लाहोटी, श्री.प्रणव शहा, श्री.हरिकिशन मालू, श्री.ज्ञानोबा शेळके, श्री. सुदर्शन भांगडीया, श्री.सिध्देश्वर कोरे, श्री. उमाकांत केराळे, श्री.माधव इंगळे, श्री.विशाल अग्रवाल, श्री.सागर मंत्री, श्री.अशोक पाटील यांची निवड करण्यात आली. विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून डॉ. सुरेश भट्टड, श्री. सतीशचंद्र चापसी, श्री.शांतीलाल कुचेरीया, श्री.शशिकांत कोटलवार, श्री.नयन नावंदर यांची निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून श्री.दत्तात्रय लोखंडे, श्री.नरेशकुमार पंड्या, आणि पदसिध्द सदस्य प्राचार्य जयप्रकाश दरगड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडणुक अधिकारी म्हणून ॲड. व्यंकट बेद्रे यांनी कामकाज पाहिले. सहाय्यक म्हणून ॲड. सुहास बेद्रे, अमित कोथिंबिरे यांनी सहकार्य केले. उपस्थित सर्व पदाधिकारी सभासदांचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांनी आभार व्यक्त केले. कोविड – १९ चे नियम पाळून सुरक्षित अंतर राखून सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या बिनविरोध, स्नेहपूर्ण निवडणुकीच्या निमित्ताने दयानंद शिक्षण संस्थेचा एक वेगळा पॅटर्न पुन्हा एकदा सिद्ध झाला.