सौ.सुस्मिता सगरे यांना मानवविकास राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार जाहीर
लातूर ( प्रतिनिधी ) : लातूर येथील श्री.श्री. रविशंकर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुस्मिता सगरे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था 2020-2021 चा मानव विकास सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दिनांक 26 मे 2021 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंती दिनी लातूर येथील दयानंद सभागृहात पद्मश्री सिंधुताई सपकाळ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पालकमंत्री अमित देशमुख , माजी खासदार डॉ. जे.एस. वाघमारे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल श्री श्री रविशंकर शाळेचे कमिटी मेंबर श्री राजेंद्र कोळगे , आशिष कोळगे तसेच सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ सोनाली कुलकर्णी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ विनया मराठे, आणि सर्व शिक्षक व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.