मुजम्मिल सय्यद यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश

मुजम्मिल सय्यद यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अहमदपूर तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मुजम्मिल सय्यद यांचा २० मार्च रोजी लातूर ग्रामीणचे आमदार धीरजभैया विलासराव देशमुख व लातूर जिल्हाध्यक्ष शैलेश उटगे, लातूर जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मद्दे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जागीरदार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. हेमंत पाटील, शहराध्यक्ष विकास महाजन, सय्यद काजम शेख खलील यांच्या उपस्थितीत बाभळगाव येथील संपर्क कार्यालयात जाहीर प्रवेश करण्यात आला मुजम्मिल सय्यद हे अहमदपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते असून गेल्या चार वर्षापासून ते अहमदपूर तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी समाजाच्या असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करुन गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रवेश केला आहे. प्रवेश केल्याबद्दल समीयोद्दीन जागीरदार, सय्यद इम्रान, कुरेशी अजमत, धीरज शेटकर, सय्यद शकील, पटेल सद्दाम,आदींनी अभिनंदन केले आहे.

चौकट
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अमितभैय्या विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी स्वीकारून प्रमाणिकपणे काम करणार असल्याचे सय्यद मुजम्मिल यांनी सांगितले आहे.

About The Author