महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले एकूणच कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे शासनाचा निषेध करण्यासाठी अहमदपूर येथे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील सर्वसामान्य गुन्हेगारांसोबतच सरकारमधील मंत्री व नेते यांचे नवनवीन प्रकरणे रोज समोर येत आहेत. प्रशासनातील अधिकारी यांच्यावर दबाव आणून त्यांच्या बदल्या करून स्वतःची प्रकरणे दबावण्याचा प्रयत्न या सत्ताधारी सरकारने सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने विरोधी पक्षाने अहमदपूर येथील तहसील कार्यालयासमोर कोरोनाचे नियम पाळत तालुकाध्यक्ष प्रा. हणमंतराव देवकत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी प. स. उपसभापती बालाजी गुट्टे, हरिशचंद्र बलशेटवार, संतोषजी कोटलवार, प्रताप पाटील, परमेश्वर पाटील, दत्तात्रय जमालपुरे, दता गोरे. माणिक कदम. सय्यद आरेफ, अर्जुन गंगथडे, सुनील मुंढे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.