महात्मा फुले महाविद्यालयाला विद्यापीठाचा ‘ए’ ग्रेड

महात्मा फुले महाविद्यालयाला विद्यापीठाचा 'ए' ग्रेड

अहमदपूरच्या शिक्षणपंढरीत मानाचा शिरपेच…!

अहमदपूर (गोविंद काळे) : अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात व विद्यापीठात अव्वल स्थानावर विराजमान होणारे येथील महात्मा फुले महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने ‘ए’ दर्जा (ग्रेड) विद्यापीठाने प्रदान केला असल्यामुळे अहमदपूरच्या शिक्षणपंढरीत मानाचा शिरपेच खोवला गेला आहे.

किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनानुसार व सहकार्यानुसार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदि क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात स्वतंत्र ‘फुले पॅटर्न’ निर्माण केला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने मार्च २०२० मध्ये महात्मा फुले महाविद्यालयातील अद्ययावत शैक्षणिक सुविधा, विविध उपक्रम, भौतिक सुविधा, प्राध्यापकांचे संशोधन,आदिंसह महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण ‘अकॅडमिक ॲंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट’ केले. यामध्ये महाविद्यालयास ७२.८५ ची टक्केवारी मिळाली असून ग्रेड ‘ए’ दर्जा(ग्रेड) प्राप्त झाला आहे. फुले महाविद्यालयास ‘ ए’ ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या सर्व पदाधिकाऱ्यानी तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, प्र . कुलगुरू डॉ . जोगेन्द्रसिंह बिसेन, व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांचे व सर्व सहाय्यक प्राध्यापकांचे व कार्यालयीन कर्मचा-यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या .

About The Author