म. फुले महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

म. फुले महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त आज येथील महात्मा फुले महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी झालेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत डोंगळीकर यांनी केले. यावेळी कोविड १९ च्या नियमाचे पालन करून महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!