घाबरू नकाआता यापुढे होमगार्डला मिळेल संपूर्ण सुरक्षा कवच

घाबरू नकाआता यापुढे होमगार्डला मिळेल संपूर्ण सुरक्षा कवच

पुणे (प्रतिनिधी) : देव करो आणि असा प्रसंग कुणावर न येवो हे बोलणे जरी अगदी सोपे असले तरी कोणावर कधी कुठली परिस्थिती उदभवेल याचा काय नेम नाही आणि नेमकी हीच परिस्थिती अडचण घेऊन श्री माणिकराव भंडगे व श्री दिपक कांबळे यांनी दोघेही तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांच्या निर्देशानुसार तत्कालीन गृहमंत्री माननीय श्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या दालनात दि.13/12/21 रोजी एक संयुक्त बैठक बोलावली होती. सदर बैठकीत इतर विषयांसोबत होमगार्डना 50 लाखाचा विमा सारख्या महत्त्वाच्या विषयावर आवाज उठविला गेला. त्यावेळी बैठकीस तत्कालीन महासमादेशक डॉ के वेंकटेशन, उपमहासमादेशक श्री ब्रिजेश सिंह, कनिष्ठ प्रशासित अधिकारी श्री विजय पवार व त्यांचे सहकारी तसेच गृहसचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

त्या अनुषंगाने आपणाला लाभलेले डॉ. बी.के. उपाध्यय व ब्रिजेश सिंग यांनी एचडीएफसी बँकेशी संपर्क साधून योजना तयार केली. किंबहुना यावर बरेच दिवस काम चालू होते शेवटी दि. 5/9/22 रोजी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रायगड जिल्ह्यातील श्री लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांना काल रोजी 25 लाखाचा धनादेश देण्यात आला. गेल्या 75 वर्षातील होमगार्डच्या हितार्थ घेण्यात आलेल्या निर्णयांपैकी हा एक ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण असा निर्णय असून यापुढे होमगार्डला निर्भयतेने काम करता येईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे तसेच यामुळे होमगार्ड व त्याच्या परिवाराला देखील एक मोठा दिलासा आधार मिळाला आहे. याबद्दल आम्ही मान. महासमादेशक सो, मान. *उपमहासमादेशक सो, मान.विजय पवार सो तसेच हा प्रश्न मार्गी लावण्याकरता मोलाचे सहकार्य केले अशा प्रशासनातील सर्व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानतो व विशेष करून एचडीएफसी बँकेचे देखील आभार मानतो.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!