डोळे हे मानवाला दिलेली निसर्गाची मोठी देणगी – डाॅ.गिल

डोळे हे मानवाला दिलेली निसर्गाची मोठी देणगी - डाॅ.गिल

उदगीर (एल.पी.उगीले) : मानवाचे शरीर विविध अवयवानी बनलेले आहे.त्यातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला दिशा देणारा जीवनात सौंदर्य फुलवणारा अवयव आहे.या डोळ्याची काळजी आपण घेतली पाहीजे.डोळ्याचे धुळीपासुन,मोबाईल,कॅम्पुटर या विविध गोष्टीपासून संरक्षण करावे. जेणे करून डोळ्याला कोणताही अजार होणार नाही.किंवा अन्य कारणाने आपणास अंधत्व येणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहीजे. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून होत असलेल्या शिबिरातून समाजातील अनेक गोर गरीब नागरिकांना दृष्टी मिळत आहे.असे ते दुर्गामाता मंदीर, भोईगल्ली,उदगीर येथे आयोजित शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी डाॅ.गिल बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दुर्गामाता देवीचे पुजन करूण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीरा अनंतवाळ,होत्या, तर मंचावर नेत्रतज्ञ डाॅ.गिल ,लाॅ.उमंग चे अध्यक्ष विवेक जैन,व्हाइस ऑफ मिडीया अध्यक्ष गणेश मुंडे, सुनिता अनंतवाळ,रंजना हिवरे,गौरी जाधव,ममता अनंतवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
नवदुर्गा सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित हळदी-कुंकवाचा व आरोग्य,नेत्र तपासणी शिबीर व मोफत आय ड्राप वाटप कार्यक्रम भोई गल्ली येथे संपन्न झाला.गणेश मुंडे सभेला संबोधताना उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर चे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ व उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयातील सर्व कर्मचारी हे अंधत्व निवारणाचा महायज्ञ जोमाने करत आहेत.या कार्यात डाॅ.रामप्रसाद लखोटीया सदैव एक पाऊल पुढे असतात, या रूग्नालयामार्फत 152 गावे अंधत्व मुक्त झाले आहेत.1लाख 65 मोतीबिंदू शस्त्रक्रिया आजपर्यंत झाल्या आहेत,11लक्ष नागरीकांची मोफत नेत्र तपासनी झाली आहे. पुढेही कार्य जोमाने सुरू आहे.या सामाजिक कार्यात नवदुर्गा सेवाभावी संस्थेने हळदी कुंकू या कार्यक्रमा बरोबरच शिबीराचे आयोजन केले. त्यांचे खरोखर कौतुक करावे तितके कमीच आहे.असे ही ते बोलत होते.या कार्यक्रमास महीला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

About The Author