प्रजासत्ताकाच्या मुहूर्तावर मटका, जुगार व अवैध धंदे बंद करण्यासाठी हलगी नाद आंदोलन ! पोलीस प्रशासनाचे दिंडोवडे!!

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहर व परिसरात खुलेआम सुरू असलेला मटका, जुगार , अवैध दारू निर्मिती व विक्री आणि प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) युवक आघाडीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी गुरुवारी ( दि. २६ ) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी हलगी नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रजासत्ताकाच्या मुहूर्तावर मटका, जुगार व अवैध धंदे बंद करण्यासाठी हलगी नाद आंदोलन ! पोलीस प्रशासनाचे दिंडोवडे!!

उदगीर शहरातील गल्लीबोळात , परिसरात व तालुक्यातील अनेक भागांमध्ये मटका, जुगार जोमात व खुलेआम सुरू आहे. शहरातील गल्ली बोळात मटक्याच्या बुकी सुरू आहेत. गल्लीबोळातील एजंट चिठ्ठी व मोबाईलद्वारे मटक्याच्या आकड्याचा खेळ स्वतःच्या फायद्यासाठी खुलेआम खेळत आहेत. तर मटका जुगारात नशीब आजमावणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. परंतु याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले आहे. याचबरोबर शहरालगत असलेल्या उपनगरामध्ये आणि तालुक्यातील गावागावात अवैध दारू विक्रीची दुकाने खुलेआम सुरू आहेत. शहर व तालुक्यातील प्रत्येक पान टपरी , किराणा दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा खुलेआम सर्रासपणे विक्री होत आहे. कर्नाटक राज्यातून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची आयात उदगीरात होत आहे. मटका जुगार व अवैध दारूच्या व्यसनामुळे सर्वसामान्य गोरगरिबांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. तर प्रतिबंधित गुटखा खुलेआम पान टपरी व किराणा दुकानातून मिळत असल्याने लहान बालके व्यसनाधीन होत आहेत. उदगीर मध्ये सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) युवक आघाडी तर्फे प्रजासत्ताक दिनी गुरुवारी ( दि. २६ ) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे रिपाइं युवक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे , नितीन गायकवाड यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

About The Author