दर्जेदार कामासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे बोंबमारो आंदोलन संपन्न
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील जळकोट तालुक्यात असलेल्या वांजरवाडा पाटी ते जळकोट पर्यंत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून, अशा पद्धतीचे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराचे नाव काळा यादी टाकून त्याच्यावर कारवाई करावी. अशा पद्धतीची मागणी एका निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला केली होती. आपल्या मागणीची दखल नाही घेतल्यास, दिनांक 24 जानेवारी रोजी बोंबमारो आंदोलन करून शासनाला आणि प्रशासनाला जागे करण्याचे काम केले जाईल. असा इशाराही दिला होता. मात्र विधानसभा मतदारसंघातील अनेक बोगस कामाला पाठीशी घालणाऱ्या बांधकाम विभागाकडून या निवेदनाची दखल वेळीच घेतली गेली नसल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले.
फक्त पंधरा दिवसातच डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. रस्त्याचे पापुद्रे निघायला लागले आहेत. त्यामुळे ठीक ठिकाणी मोठे खड्डे पडून रस्ता उघडला जातो आहे. अशा पद्धतीचे बोगस आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे, व सदरील रस्ता संबंधित गुत्तेदाराकडून काढून घेऊन पुन्हा नव्याने करावा. आणि अशा पद्धतीचे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी जिल्हा परिषद उप अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या निवेदनाची फारशा गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाकडून बोंब ठोकताच बांधकाम विभाग खडबडून जागा झाला, आणि लवकरच यासंदर्भात कारवाई करू असे आश्वासन आंदोलन कर्त्यांना दिले. या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विनोद तेलंगे, उदगीर तालुकाप्रमुख रविकिरण बेळकुंदे, विधानसभा अध्यक्ष सूर्यभान चिखले, विधानसभा संघटक बंडेप्पा पडसलगे, कार्याध्यक्ष महादेव आपटे, संपर्कप्रमुख सुनील केंद्रे, मीडिया प्रमुख अभय कुलकर्णी, देवणी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर, सरचिटणीस दीपक सगर बोंबळीकर, तालुका उपाध्यक्ष संजय मुराळे देवणीकर, जळकोटचे अध्यक्ष दत्ता शिंदे, सुदर्शन सूर्यवंशी, पंढरीनाथ कांबळे, अंगद मुळे, सोपान राजे, बळीराम श्रीमंगले, बालाजी बिरादार, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार, महादेव मोतीपवळे, सचिव अविनाश शिंदे, निळकंठ मुधोळकर, आडे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी याप्रसंगी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलनाची दखल घेतल्यामुळे आणि लेखी आश्वासन दिल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन थांबवले.