श्रमिक हक्क अभियानाच्या वतीने देवणी नागरपंचायतीसमोर बेमुदत सत्याग्रह,आमरण उपोषण,व आत्मदहनाचा इशारा

श्रमिक हक्क अभियानाच्या वतीने देवणी नागरपंचायतीसमोर बेमुदत सत्याग्रह,आमरण उपोषण,व आत्मदहनाचा इशारा

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी शहरात श्रमिक हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार पासून नगरपंचायत कार्यालय समोर बेघरांना भूखंडाचा ताबा व मूळ कागदपत्रे मिळावेत, यासाठी ८७ बेघर लाभार्थ्यांना घेऊन बेमुदत सत्याग्रह,आमरण उपोषण,व उपोषण सुरू केले आहे.यावेळी उपोषणकर्त्यांनी नागरपंचायतीस आपल्या मागण्याचे निवेदन दिले.या निवेदनात गेल्या ९वर्षापासून गावठाण वाटपातील जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू असून सर्वे नं २२६/२३८/१ मधील दोन हेक्टर आरक्षित क्षेत्रातील जमीन भूखंड वाटप करण्याकरिता महाराष्ट्र राज्य मानवी आयोग व विभागीय आयुक्त यांनी लेखी आदेश देवूनही नगरपंचायत देवणी यांनी सदर भूखंड वाटप केलेला नाही. पात्र लाभार्थींना प्रत्येक्ष ताबा देण्यासंदर्भात नागरपंचायतीकडून कायदेशीर कार्यवाही झाली नसल्यामुळे श्रमिक हक्क अभियानाच्या वतीने ८७ बेघर पात्र लाभार्थ्यांना भूखंडाचा ताबा व मूळ कागदपत्रे मिळावेत. या मागणीसाठी देवणी नागरपंचायत समोर बेमुदत उपोषनास बसले आहेत.लाभार्थ्यांनी ताबा द्या व गावठाण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापचे या घोषणाने नगरपंचायत परिसर दणाणून सोडला. या उपोषणात श्रमिक हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, ऍड.जयवर्धन भाले,अनिता कांबळे,दशरथ कांबळे,बालाजी टाळीकोटे,देवानंद सावंत, बळीराम बनसोडे,उमाकांत कांबळे,पद्माकर कांबळे,अण्णाराव सूर्यवंशी, गजानन गायकवाड,देविदास सूर्यवंशी,रमेश गायकवाड, कमलाकर चिकटे यासह लाभार्थी सत्यभामा गायकवाड, संध्याराणी घोरपडे, चित्रकला वालेकर,धोंडूबाई कांबळे, सुफीया पठाण,प्रेमाबाई कांबळे,शेवंता कसले,सुमन पतंगे, जयश्री कल्याणकर यांच्यासह अनेक लाभार्थी उपोषणात बसले आहेत.

About The Author