वैचारिक व सांस्कृतिक नेतृत्व उदयगिरीने केले आहे – डॉ. नागोराव कुंभार
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप व संत तुकाराम पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट प्रकाश तोंडारे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष,तसेच प्रमुख उपस्थितीत रामचंद्र तिरुके सचिव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, व्याख्याते सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. नागोराव कुंभार, सत्कारमूर्ती डॉ.शिवाजीराव नरसिंगराव जवळगेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संदीकर, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे समन्वयक प्रा. डॉ. बाळासाहेब दहिफळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चंद्रकांत भद्रे, मराठी विभागाच्या डॉ. अर्चना मोरे, डॉ. कोंडीबा भदाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठी विभागाच्या माजी विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे संत तुकाराम हा राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी देण्याचे निश्चित केले आहे.
यावर्षीचा हा पहिला पुरस्कार प्रा. डॉ. शिवाजीराव जवळगेकर मराठी विभाग प्रमुख दयानंद कला महाविद्यालय लातूर यांना देण्यात आला.डॉ.नागोराव कुंभार यांनी संत तुकाराम अध्यासन मराठी विभागातर्फे काढण्यात येणार आहे. या विषयी समाधान व्यक्त केले. या अध्यासना संदर्भात सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन करण्याचे त्यांनी मान्य केले.
विविध स्पर्धांचे आयोजन या पंधरवड्या निमित्य करण्यात आले. निबंध, वक्तृत्व, प्रेमपत्र लेखन या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व ग्रंथ भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजकुमार मस्के यांनी व आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक चिद्दर यांनी केले.