हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून अनोखी गुरू दक्षिणा शिव सैनिकांनी दिली.

या वेळी मातेकर अविनाश पांडुरंग,शिंदे जगदीश कमलाकर,जाधव श्रीकांत गोवर्धन,पाटील कैलास मुरलीधर,सपकाळ सुभाषराज भास्कर,कनुरे बालाजी राजकुमार,मठपती संजय विश्र्वंभरराव,चापुले अंतेश्वर,पाटील प्रमोद गोविंदराव,कांबळे विकास लिंबराज,सुगंधी राम जगदीश,लाला नागेश कल्याणराव,पुदाले शिरीष प्रभू,जाधव गोविंद विनोद,जाधव राहुल बाबुराव,पाटील रोहित भगवानराव यांनी रक्तदान करून गुरू चरणी दक्षिणा वाहिली.

या शिबिराचे आयोजन उदगीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने केल्याबद्दल मुन्ना पांचाळ,मठपती संजय यांचा सत्कार नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीर च्या वतीने डॉ.शेटकार यांनी केले. व सर्व रक्तदान करणाऱ्या तरुणांचे आभार व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!